औरंगाबाद- आलिशान अशी डेक्कन ओडिसी विशेष रेल्वे शुक्रवारी (ता.२३) सकाळी साडे नऊच्या सुमारास औरंगाबाद रेल्वे स्थानकात दाखल झाली. यातून तब्बल 74 पर्यटकांचे औरंगाबादेत आगमन झाले.
त्यात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, युएसए येथील पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप खंडेराय यांच्या
कलापथकाने ‘नमन नमन’ या पारंपरिक नृत्याने पर्यटकांचे स्वागत केले.
यावेळी पारंपरिक वेशभूषेत कलावंतांनी कलेचे महत्त्व पर्यटकांना पटवून दिले. हे
पर्यटक वेरुळ, दौलताबाद आदी पर्यटन स्थळांना भेटी देऊन डेक्कन
ओडिसीतून मुंबईला जाणार असल्याचे जसवंतसिंग यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.










